नवा व्यवसाय सुरु करायचा म्हटला कि त्याच्या परवानगी साठी अनेकदा सरकारी कार्यालयांच्या खेटा घालाव्या लागतात. बी.एम.सी. लवकरच आपली वेबसाईटची सुधारणा करीत असून अनेक अडचणींचे एका क्लिक सरशी निरसन होणार आहे, ‘ इज ऑफ डुइंग बिझनेस ‘ नुसार नवीन दुकान, हॉटेल, गोडाऊन सुरु करण्यासाठी स्वास्थ्य सेवा, अग्निशमन दलाच्या परवानगी सहित इतर विभागांची अनुमती देण्याची व्यवस्था ह्या वेबसाईट वर आहे. संबंधित विभागाच्या एका अधिकाऱ्याने अधिक माहिती दिली कि आम्ही नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी हि व्यवस्था केली आहे आणि लवकरच नूतनीकरणाच्या कामाला सुद्धा ऑनलाईन करणार आहोत ज्याने मुंबई करांना बी.एम.सी. कार्यालयात खेटा घालायची गरज पडणार नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews